फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी..

प्रतिनिधी-पिंपरी -चिंचवड दि.७ मे २०२३ खूप दिवसांपासून कलामहासंघात सुरू असलेली चर्चा अखेर लोकशाही पद्धतीने शांत झाली.
आज फूले शाहू आंबेडकर कला महासंघाची भीमसृष्टी येथे महत्त्वाची मीटिंग झाली. त्यामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान झाले.
अध्यक्षपदासाठी खेळीमेळीच्या वातावरनात निवडणूक घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने लक्ष्मण माने व भारत बाबू लोणारे हे दोघं अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उभे होते. मीटिंग साठी एकूण 17 सदस्य उपस्थित होते उपस्थितांपैकी 7 मते भारतबाबू लोणारे व 10 मते बापू माने यांना पडली.
चार सदस्यांनी फोन द्वारे मते पाठवले पैकी तीन मते बापू माने व एक मत भारत लोणारे यांना पडले.
या निवडणुकीत भारतबाबु लोणारेंना एकूण आठ व बापू माने यांना 13 मते पडली. बापू माने यांचा बहुमताने विजय झाला.
सर्व उपस्थित कलावंतांनी नंतर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
या निवडणुकीत अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य उत्तमरीत्या पार पाडले.
कलामहासंघाचे अध्यक्ष बापू माने यांनी त्याच ठिकाणी दोन पदांची नियुक्ती केली.
कार्याध्यक्ष पदावर अनिरुद्ध सूर्यवंशी तर खजिनदार म्हणून किशोर रणवीर यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष बापू माने यांनी सर्वांचे आभार मानून मिटिंगचा समारोप केला.




