आंदोलनकलापूणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन’ संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रश्नांवर १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा..

प्रतिनिधी पुणे दि. ०७ सप्टेंबर २०२६ ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन’ संघटनेच्या वतीने १६ प्रमुख मागण्या १ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर करण्यात आले.
१६ मागण्या मधील काहीप्रमुख मागण्या खालील प्रमाणे.
१ ) ‘महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण २०२४’ ची तातडीने अंमलबजावणी करणे व शासकीय आदेश (GR) काढणे.
२ ) चित्रपट वितरणात डिजिटल व पारदर्शक प्रणाली लागू करून ‘डेली कलेक्शन रिपोर्ट’ mandatory करणे.
३ ) ब्लँक आणि कॅश तिकीट विक्री पूर्णपणे बंद करणे.
४ ) मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये मोक्याच्या वेळी (प्राइम टाइम) शो मिळवून देणे.
५ ) निर्माते व कलाकारांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हास्तरावर पोलीस विभागात ‘सांस्कृतिक सेल’ स्थापन करणे.
६ ) संस्थेचा पाठिंबा: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
७ ) नेतृत्व: संघटनेचे अध्यक्ष सी. ए. प्रसाद दत्तात्रय इंगवले आणि विविध जिल्ह्यांतील समन्वयक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
व इतर ही मागण्या आहेत

यावेळी मा. मेघराज राजे भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ – आंदोलनाला पाठिंबा व मार्गदर्शक), सी. ए. प्रसाद दत्तात्रय इंगवले (अध्यक्ष, मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन), सचिन पिंपरीकर (पुणे समन्वयक), हर्षल पाटील (पुणे समन्वयक), सतीश आंबर्डेकर (कोल्हापूर समन्वयक), कृष्णात पाटील (सांगली समन्वयक), राजेंद्र लोंढे (सांगली समन्वयक), नितीन मनोहरे (अमरावती समन्वयक), रवी भोंगाडे (यवतमाळ समन्वयक) व असंख्य कलाकार व प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button