“…हा प्रकार तर लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा” – प्रमोद क्षिरसागर

प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एम.एल.डी. जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या सुमारे ४६ वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर हे देवेंद्र फडणवीस यांचा लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवून सनदशीर निषेध नोंदवणार होते. त्या अनुषंगाने आज सकाळीच निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा आहे. शेतकर्यांच्या न्यायिक मागणीचा आवाज बुलंद करणार्या कार्यकर्त्याला ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. सचिन काळभोर यांची त्वरित सुटका करावी अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे यूथ मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी या वेळी सांगीतले.



