महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

..अखेर त्या “फ्री पासची” मागणी करणार्‍या पोलिसाचे झाले निलंबन..

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या “फ्री पास” प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांची संपूर्ण देशात बदनामी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेत सदर प्रकरणाची सारवासारव करीत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले.
पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलिसनाईक महेश नाळे असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाचे पिंपरी येथील एचए मैदानावर प्रयोग सुरू आहेत. पिंपरीमध्ये एका पोलिसाने फ्री पास दिले नाहीत तर महानाटयाचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते तसेच त्या संबंधित पोलिसांना समज देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी महेश नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आणि पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना या प्रकराणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!