देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

त्यागमुर्ती माता रमाईयांचा ८८वा स्मृती अभिवादनदिन पिंपरीत संपन्न झाला..

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी येथे त्याग मूर्ती माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
सकाळी १० वा. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी प्रफुल पौराणिक सर जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. मनोज गजभार स्मारक समिती सदस्य. दत्ता गायकवाड. रामभाऊ ठोके. अनिल खरात. उपस्थित होते.
सायं. ६ वाजता सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली ६:३० वाजता बालचमूंनी सादर केलेला त्याग मूर्ती माता रमाईंची जीवन गाथा हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला.
७:०० वाजता त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर व्याख्यान व्याख्याते प्रवीण पुणेकर, ८:३० वा. आदरांजलीपर गीत गायनाचा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर विचारमंच सादर करते अनिरुद्ध सूर्यवंशी आणि संच.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शामाताई जाधव यांनी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर व नियोजित रमाई स्मारक लवकरात लवकर सर्वांना सोबत घेऊन कशाप्रकारे करता येईल याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले धम्मराज साळवे, मनोज गजभार, मूकनायकचे संपादक तूषार गायकवाड, विशाल कांबळे, राजू साळवे, विजय ओव्हाळ, दत्ता ठाणांबिर, तुकाराम गायकवाड, प्रवीण कांबळे, रवी कांबळे, गायक शेखर गायकवाड, महायान मसुरे, राजन नायर, मूकूंद रनदिवे, मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, पत्रकार शफिक शेख, पत्रकार शितल आल्हाट, प्रमोद शिरसागर, सुरज गायकवाड, गायक संकल्प गोळे, गायक धीरज वानखेडे, मंदाकिनी गायकवाड, प्रिया शेख, कौशल्या गजभार, वंदना गायकवाड, वाघ मॅडम, अजय कांबळे, शालिनी वाघमारे व पिंपरी चिंचवड शहरातील धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!