भटक्या कुत्र्याचा दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला..
प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. भोसरी भागातील लांडगे वस्ती येथे भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात श्रीजित काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभिर जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी ही मुल भोसरी परिसरात खेळत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्यांने जीवघेणा हल्ला केला. भटक्या कुत्र्याने श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड या दोन मुलांच्या चेहऱ्याला चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, या दुर्घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
वेळोवेळी लोक प्रशासनाला तक्रार देवून ही पालिका प्रशासन या भटक्या कूत्र्यांचा बंदोबस्त करत नाही. विषयाला बगल देणे सूरू आहे. आता तरी हे प्रशासन जागे होणार आहे काय? की पून्हा झोपेचे सोंग घेवून सूस्तावलेल्या अजगराप्रमाणे पडून राहणार आहे. असा प्रश्न जनमानसात विचारला जातोय. व त्या बालकांन विषयी हळहळ ही व्यक्त केली जातेय.