महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा.. (मा. नगराध्यक्ष मंगेश पाटील)

प्रतिनिधी- अजय विघे (कोपरगाव) ७२ वर्षांपूर्वीचा कोपरगावकरांच्या स्मरणात राहील असा मोठा पूल पाडायला सुरुवात झाली आहे. हा पूल संपूर्णपणे दगडी बांधकामात करण्यात आला होता. या कामासाठी सर्व दगड घडवण्यात आले होते. या दगडांची किंमत आज लाखो रुपये कोटीच्या घरात मध्ये आहे. नगरपालिका प्रशासनाने शहराच्या हद्दीत जवळपास शासनाची काय काम चालू आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे सर्व मौल्यवान असे घडवलेले दगड पोकलेन मशीन सर्व जमिनीत पाडल्यामुळे पडत आहे .जमीन दोस्त होत आहे. शासन दरबारी जर योग्य पद्धतीने पाठपुरावा केला असता तर हे सर्व दगड कोपरगाव शहराच्या सौंदर्यात भर घालण्यात मोठी मदत झाली असती.

संपूर्ण मोठा पूल हा घडीव दगडात बांधलेला होता. मोठ्या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे होते हे कठळे चौकोनी दगडांमध्ये खूप छान घडवलेले होते. तसेच खालच्या पायासाठी व बाजूंच्या भिंतींच्या सपोर्ट म्हणून ही एक बाजूने सर्वे दगड घडवलेले होते .सदरचे सर्व दगड जर नगरपालिकेने शासना कडून मिळवले असते तर ठीक ठिकाणी कोपरगाव शहरात जे झाड आहेत किंवा जे बगीचे भविष्यात विकसित करणार आहेत. त्याच्या सभोवताली दगडी कठडे बांधता आले असते. गोदावरी नदीकाठी घाट बांधण्यासाठी या सर्व दगडांचा वापर करता आला असता, की जेणेकरून शुक्राचार्य मंदिर कचेश्वर मंदिर या ठिकाणी बाहेरगावचे लोक दर्शनाला आले असता हा दगडांचा घाट नदीकाठी शोभूनिय दिसला असता. त्याचबरोबर जिजाऊ उद्यान येथे तसेच अन्य ठिकाणी वॉकिंग ट्रॅक साठी त्या दगडांचा वापर करता आला असता . तसेच अमरधाममध्ये ही त्याचा वापर करता आला असता.अशा अनेक रेखीव गोष्टी की ज्यात शहराचे सौंदर्य वाढले असते अशा ठिकाणी या दगडांचा वापर करता आला असता. तसेच जुनी वेशीला व तिच्या दोन्ही बाजूस खाली काही अंतर चालण्यासाठी हे दगड बसवता आले असते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या ओपन स्पेस मध्येही ते नगरपालिकेला देता आले असते.

तरी देखील नगरपालिकेने अजूनही जे जुना छोटा पूल होता त्याचेही मोठमोठे दगड आजही नदीत पात्रात तसेच पडलेले आहेत व आत्ता हा जो मोठा पूल पाडला जात आहे याचे दगड मिळवता जर आले तर निश्चित फार काही परिश्रम न घेता लाखो करोडो रुपयांचे हे किमतीचे दगड शहर विकासासाठी मोफत मिळतील व वापरता येतील .यासाठी अजूनही नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराकडे शासनामार्फत तातडीने पाठपुरावा करावा. व असे हे मौल्यवान घडवलेले दगड मिळवावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!