गोदावरी पुलाच्या घडीव दगडाचा स्वामी समर्थ मंदीराच्या बाजूने घाट बांधावा..
प्रतिनिधी- अजय विघे कोपरगाव येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक पूल पाडण्यात आला असून या पुला साठी तत्कालीन अभियंत्यांनी घडीव दगडात बांधकाम केले होते.आता हे बांधकाम पाडण्यात आले आहे मात्र या घडीव दगडा पासून स्वामी समर्थ मंदिराचा घाट सुशोभीकरण करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केली आहे
कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मा मंगेश दादा पाटील यांनी नुकतेच नगर पालिकेला आवाहन केले की,सदर घडीव दगड नगर पालिकेने उपयोगात आणून एखादी वास्तू बांधावी मात्र गोदावरी नदीच्या लहान पुलाच्या पूर्व बाजूने कै सूर्यभान पाटील वहाडणे घाट आहे त्या प्रमाणेच पश्चिम बाजूने स्वामी समर्थ मंदिरा शेजारी घाट बांधावा व त्या साठी या घडीव दगडाचा वापर केल्यास स्वामी समर्थ मंदिरात येणारे भाविक व कोपरगाव शहरातील नागरिक यांना एक चांगला घाट बनवता येऊ शकतो व गोदामाई ची चांगली शोभा वाढेल.अशी सूचना मला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पंडोरे यांनी केली आहे.मला देखील ही संकल्पना आवडली असून शहर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने खूप चांगली संकल्पना आहे
कोपरगाव च्या नागरिक व नगर पालिकेच्या गतिमान प्रशासनाने हा निर्णय तातडीने घ्यावा त्यास कोपरगाव येथील नागरिकांनी एकमुखी पाठिंबा द्यावा असे आवाहन अँड.नितीन पोळ यांनी केले आहे