प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड सिद्धार्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी उन्हाळी पोहणे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. पोहणे हा फक्त क्रीडाप्रकार नसून ते स्वयंसरक्षणच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे. त्यासाठी सिध्दार्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने दरवर्षी हे शिबिर आयोजित केले जाते. यासाठी श्रुती मरळीकर व त्यांच्या सोबत प्रशिक्षकांची मोठी फळी काम करत आहे. या शिबिरा पुरते मर्यादित न राहता येत्या काळात सिध्दार्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने व्यवसायीक पोहण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल जेणेकरून ऑलम्पिक सारख्या स्पर्धे मध्ये पिंपरी विधानसभेतील खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळेल. आज या शिबिरात सहभागी पाल्याना “आमदार आण्णा बनसोडे” यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजित केल्या बद्दल संस्थेचे सचिव जयंत मरळीकर, श्रुती मरळीकर, किशोर पाडोळे यांचे अभिनंदन केले. आजच्या या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, सचिन वाल्हेकर व पालक उपस्थित होते.