आर्थिकगून्हामहाराष्ट्रविशेषशहर

पालिकेत पून्हा एक लाच खोरी उघड.. सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे ACBच्या जाळ्यात

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पून्हा एक लाच खोर अधिकारी पकडला गेला प्रशासनाचा कारभार डागाळल्याचे पून्हा एक उदाहरण समोर आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान निरीक्षकाला १७ हजार ५०० हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल आहे . त्यातच आज नेहरूनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण पुष्प उद्यान विभागाचे सहाय्यक निरीक्षक किरण मांजरे यांनी एका ठेकेदाराला लाच मागितली होती. त्यासंदर्भाची तक्रार लाच लुचपत विभागाकडे करण्यात आल्यानंतर, आज लाचलुचपत विभागाने धाड टाकून सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडल. पालिकेतिल अधिकार्‍यांचा असा “रात्रीत खेळ चाले” अशी “मालिका” सर्रास पहायला मिळू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!