गून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

आपल्या आया-बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत ही गोष्ट वारंवार सिद्ध होते आहे.. जितेंद्र आव्हाड

प्रतिनिधी- काल मुंबईत एका 18 वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. आज त्याच मुंबई मिरारोड मध्ये एका 36 वर्षीय (सरस्वती वैद्य) महिलेला मारण्यात आले. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्या तुकड्यांना कुकर मध्ये शिजवण्यात आले. त्यानंतर त्या शिजवलेल्या तुकड्यांना मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट बनवून त्याची आरोपीने जागोजागी विल्हेवाट लावली.
आरोपीचं नाव मनोज साने महिलांची सुरक्षितता ही अत्यंत धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. राज्यात आपल्या आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत ही गोष्ट वारंवार सिद्ध होते आहे.
परंतु याकडे या सरकारचे काडीमात्र लक्ष नसून, धार्मिक गोष्टींच्या राजकारणावर ही सत्ताधारी मंडळी जास्ती लक्ष केंद्रित करून आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी लोक धार्मिक बाबींवर राज्यातील वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं. या राज्यात महिलांना मोकळ्या हवेत श्वास घेता येईल, त्या भयमुक्त राहतील हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. असे मत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटकरून व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!