
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दिनांक १२ जून २०२३ ते २६ जून २०२३, हा नशा मुक्त भारत पंधरवडा, साजरा करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव मा. डॉ. सुमंत भांगे साहेब, यांनी दुरदृश प्रणालीद्वारे अधिकारी वर्गाची बैठक घेऊन हा पंधरवडा नशा मुक्त अभियान राबविण्यात यावे, आशा शासकीय स्तरावरून सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार दिनांक 12 जून 2023 रोजी पिंपरी चिंचवड परिसरात हे नशा मुक्त भारत अभियान राबविले जावे म्हणून, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेने एक लेखी निवेदन मा. चौबे साहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना दिले आहे .
यामध्ये म्हटले आहे की, सदरील ठिकाणच्या झोपडपट्टी विभाग सध्या हातभट्टी दारूचा उत म्हणजेच महापूर आहे. त्यातून विशेषतः बालाजीनगर, भोसरी पुणे 26 या झोपडपट्टी मध्ये तर 25 ते 30 दारूचे धंदे अगदी जोरात गेली 30ते 40 वर्षा पासून सतत चालू आहेत. यांच्यावर अनेक वेळा पोलिसांनी रेड टाकून त्यांना कोर्टात हजर केले जाते, परंतु दारूधंदे वाले धंदे कांही बंद करत नाहीत.
म्हणून गेल्या काही महिन्यात सदरील ठिकाणचे सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते आणि भोसरी एम. आय .डी .सी. स्पाइन रोड, भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा .राजेंद्र निकाळजे साहेब, यांना सोबत घेऊन सदरील ठिकाणच्या सर्व हातभट्टी दारू धंदे वाले यांचा सदरील ठिकाणच्या बौद्ध विहारात बोलावून घेऊन, त्यांना प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन सत्कार करून, गांधीगीरी पद्धतीने अगदी समजावून सांगितले की, दारूचे समाजावर व येणाऱ्या पीढीवर किती वाईट दुष्परिणाम होतात, तरी हे धंदे तुम्ही बंद करा व इतर अनेक धंदे स्वाभिमानाने जगण्यासाठी आहेत ते करा आणि मानाने समाजात जगा.
त्यासाठी नवीन पिढी वाया न जाता ती सुशिक्षित व्हावी म्हणून, बौद्ध विहार मध्ये मा. निकाळजे साहेबांनी सर्वांना विशेषतः नवीन पीडिला वाचनकरण्यासाठी लायब्रीची सोय उपलब्ध करुन दिली.
परंतु घडले उलटेच सदरील ठिकाणच्या हातभट्टी दारू धंदे करणाऱ्या व्यक्तींना ज्यास्तच स्फूरण चढून आतातर पहिल्या पेक्षा अधिक प्रमाणात धंदे चालू आहेत.
त्यासाठी आमच्या या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सदरील कार्यक्षेत्रातील पोलिस आयुक्त मा .चोबे साहेब यांना एक निवेदन दिले की, आपण स्वतः या मध्ये लक्ष घालून, बालाजीनगर, भोसरी पुणे 26 येथील हातभट्टी दारूधंदे बंद करावेत, आणि जी व्यक्ती धंदा बंद करत नाही, अशांना ,समाज हित लक्षात घेऊन तडीपार करण्यात यावे. असे सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांनी सांगीतले.
या निवेदनावर सदरील ठिकाणचे सर्व पक्षीय तसेच कांही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने – प्रा. बी. बी. शिंदे, मा. रामभाऊ ओव्हाळ, मा. किशनराव सरवदे, मा. तुकाराम गव्हाणे, मा. बाळासाहेब जाधव, मा. युवराज मस्के, मा. लक्ष्मण सिरसाट, मा. दिलीप बनसोडे, मा. हरीचंद्र शिंदे,
मा. सागर ओरसे, मा. लिंबराज वाघमोडे, मा. संदीपानजी झोंबडे साहेब, मा. नशीर शेख.



