गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची निर्घृन हत्या..

प्रतिनिधी, दि. १७ जून सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते “नालसाब मुल्ला” यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी आठ गोळ्यांच्या फैरी झाडून हत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिस घटनास्थळी पोहचून अधिक तपास करत आहे.
सांगली शहर शनिवारी गोळीबाराच्या घटनेने हादरले. विशेष म्हणजे घटना शहरातल्या शंभर फुटी रोड जवळ मुल्ला यांच्या राहत्या घराच्या समोरच घडली.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले नालसाब मुल्ला हे आपल्या राहत्या घराच्या दारात बसलेले होते. त्याचवेळी ते हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी नालसाब यांच्यावर आठ गोळ्यांच्या फैरी झाडल्या, आणि हल्लेखोर त्यानंतर तेथून पसार झाले. ही घटना वाऱ्यासारखी सांगली शहरात पसरली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेमागचे नेमके कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे.
परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या या भागात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि नंतर तेथून लगेच ते पळून गेले. आरोपी नेमके कोणत्या दिशेला पळून गेले आणि हल्ल्या मागचा त्यांचा नेमका हेतू काय? नेमकं त्यावेळी काय घडले, याची सविस्तर माहिती पोलिस जमा करत आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!