रा.प.म. मधे होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याने वरिष्ठ अधिकारी अवलंबतात बदली तंत्र..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मारुती दत्तात्रय राऊत यांनी काल १४जून पासून उपसले अमरण उपोषनाचे हत्यार उपोषन स्थळी ते बोलले की मी एस. टी. मधे कारागीर यापदावर सध्या विभागीय कार्यशाळा दापोडी पुणे येथे कार्यरत होतो. एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत इतर मार्गाने अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार मी उघडा केल्यामुळे या ना त्या मार्गाने रापमचे अधिकारी माझ्यावर वारंवार अन्याय करत आहेत. अशाच प्रकारचा
अन्याय करून अकारण दिनांक १ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय कारण सांगून मध्यवर्ती कार्यशाळा
दापोडी पुणे येथून सातारा विभागामध्ये बदली करून माझ्यावर सूड उगवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बदली करून अन्याय केला होता. सदर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायदेशीर
मार्गाने मी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. सदर आमरण उपोषण मागे घेण्यासाठी दिनांक ०४/०४/२०२३ रोजी मला सायंकाळी ५ वाजता कार्यशाळा व्यवस्थापक यांच्या दालनात चर्चेसाठी बोलवण्यात आले होते. सदर चर्चेमध्ये असे मान्य करण्यात आले होते की, १) माननीय औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी दिलेल्या मुदतीत करण्यात येईल. २) प्रशासकीय बदली केल्याच्या तारखेपासून
आमरण उपोषण स्थगित केल्याच्या तारखेपर्यंत पगारी रजा मंजूर करण्यात येईल. ३) सातारा विभागात करण्यात आलेली प्रशासकीय बदली रद्द करून विभागीय कार्यशाळा दापोडी पुणे येथे तीन महिन्याकरता बदली करून नंतर एसटी मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे येथे रुजू करून घेण्यात येईल. असे तीन मुद्दे चर्चेदरम्यान मान्य करण्यात आले. सदर चर्चेला महामंडळाकडून कार्यशाळा व्यवस्थापक व इतर अधिकारी व माझे तर्फे मी स्वतः, श्रीमती ललिताताई जाधव, श्री शिरीषजी पुकाळे साहेब, श्री राजू सावळे साहेब व इतर सहकारी उपस्थित होते. वरील प्रमाणे मान्य अटींची अंमलबजावणी आजच्या तारखेपर्यंत झालेली नाही. त्यामुळे सदर मान्य अटींची अमलबजावणी करण्याकरीता दिनांक १२/०५/२०२३ रोजी आपणास पत्र देऊन सूचित केले आहे.आणि सदर पत्रानुसार आपणास असेही कळवले आहे की, सदर मान्य अटींची अंमलबजावणी न
झाल्यास मला आपण करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषणाची तयारी करावी
लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तरीसुद्धा आपण वरील मान्य अटींची अंमलबजावणी न करता
वारंवार माझ्यावर अन्याय करून मला आमरण उपोषण करण्यास भाग पाडत आहात. या करिता
आपणास या नोटीस द्वारे कळविण्यात येत आहे की, आपण माझ्यावर वारंवार करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी दिनांक १४/०६/२०२३ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भिम सृष्टी) पुतळ्याशेजारी पुणे मुंबई रोड, पिंपरी चौक पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास आणि सदर उपोषणादरम्यान माझी जीवित हानी झाल्यास
व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा स्वरूपाचे पत्र मी वरिष्ठांना सादर केले आहे. असे उपोषनकर्ते मारुती राऊत सांगीतले.




