विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२ मोठ्या उत्सवात साजरा.

प्रतिनिधी अजय विघे|
कोपरगाव विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळेमध्ये दि.२६/०६/२०२३ रोजी शालेय प्रांगणात शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.राजेंद्र जोशी सर, एस. एस. जी. एम. कॉलेजचे प्राध्यापक श्री. अमोल चंदनशिवे, श्री प्रसाद साबळे व अनुवाद आपला न्युजचे पत्रकार श्री. अजय विघे सर या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवळी सर यांनी केले. प्रास्ताविकात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांना विकास पत्र बाबत माहिती देण्यात आली. शालापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश पालकांच्या लक्षात आणून दिला. मुल शाळेत पहिल्यांदाच ज्या वेळेस येते त्या वेळी त्याच्या मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण न येता त्याने आनंदाने शाळेत यावे, शालेय वातावरणात रमावे आणि हिच आपलेपणाची भावना बालकाच्या मनात रुजावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. इयत्ता १ ली तील दखलपात्र बालकांचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक, भाषिक विकास कितपत झाला आहे हे पडताळणी करून खेळीमेळीच्या वातावरणात या बालकांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी हा उद्देश शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करून साध्य करण्यात आला.
या मेळाव्यास ७० पालकांनी आपल्या पाल्यासोबत सर्व स्टॉल वरील आयोजित शारीरिक, भावनिक, बौद्धिक व भाषिक विकास खेळांचा मनमुराद आनंद घेतला. या प्रसंगी अध्यक्षांच्या वतीने श्री प्रसाद साबळे यांनी देखील पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा सेल्फी पॉइंट मध्ये फोटो घेण्यात आले. शेवटी सर्व पालकांचे व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवळी सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.





