महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महावितरणाचा ढिसाळ कारभार तक्रार करून ही होत नाही काम दोन वर्षापासून चालढकल सूरू..

प्रतिनिधी कात्रज कोंढवा रोड सर्वे नंबर 36 आंबेडकर नगर/आर के कॉलनी फॉरेस्ट शेजारी दोन-तीन वर्षापासून वायरींच्या गुंत्यामुळे व वायरी डोक्याच्या अंतरावर खाली असल्याने येताजाता अडथळा होत आहे व धोकाही वाढत आहे. त्या वायरींमुळे खूप वेळा शॉर्टसर्किट होऊन आग ही लागली आहे. सदर विषयांच्या तक्रारी वेळोवेळी करून सुद्धा वायरिंगचं काम अद्याप झालं नाही. मागील वेळी एका पत्र्याच्या घरावर वायर पडून शॉक उतरल्यामुळे रात्री दीड वाजता स्थानिक दलित वस्तीतील लोकांची खूप धावपळ झाली. आम्ही उशिर न करता विद्युत अधिकारी शिवलिंग बोरे साहेबांना कॉल करून विद्युत प्रवाह बंद करून घेतले. त्यांनी ही तत्पर्ता दाखवत या भागाची पूर्ण विद्यूत प्रवाह बंद केला. त्या मूळे कसली हानी झाली नाही. अशा अनेक घटना येथे होतच असतात तरी लवकरात लवकर या भागात विद्युत प्रवाह वाहिनी भूमिगत करून देण्यात यावी अशी मागणी येथे राहणारे रहिवाशी करत आहे. या वेळी ग्राहक संरक्षण परिषद समितीचे सदस्य नितिन नडेकर यांनी सांगीतले की ही दलित वस्ती असल्यामुळे येथे जानूनबूजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षापासून तो खांब आहे अजूनही अद्याप कुठल्याही प्रकारचं तक्रारी नंतर दूरूस्तीचे काम झालं नाही. गेल्यावर्षी तर एका घराला वायरिंगच्या स्पाक्रिंगने आग लागली होती. त्यात ते घर जळून खाक झाले. सोबत शेजारील दोन तिन घरांना ही आग लागली सर्व सामान्यांचे नूकसान झाले. या वेळी ही असंख्य तक्रारी दिल्या पण नेहमी प्रमाणेच घडले “पालथ्या घड्यावर पाणी” आजतागायत कसली ही सूधारणा झाली नाही हे दुर्दैव. या वायरींच्या जाळ्या मूळे कोणाचा जीवही जावू शकतो. आता तर पावसाला सूरूवात होतेय पावसात मागे सतत वायरिंगचे स्पाक्रिंग होवून आग लागण्याचे प्रकार होतात तरी सुद्धा आम्ही विद्युत विभागाला विनंती करतो की या गरिब कूटूंबांना वायरींच्या जाळ्यातून मोकळा श्वास घेवूद्या. बिलाच्या वसूलिला जसे अधिकारी पाठवता व बिल जमा करून घेता तसेच एकदा तक्रारी निवारणाकरीता एखादा अधिकारी पाठवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!