महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

समृद्धी’वरील अपघात थांबेना! भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी अजय विघे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!