देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“तेलंगणा पर्यटन विभागाकडून बोधिसत्वाच्या समर्पित कार्याचा गौरव”

प्रतिनिधी तेलंगणा धम्मचर्क प्रवर्तन व आषाढी पौर्णिमेच्या (वर्षावास) शुभ मुहूर्तावर दि. 03 जुलै 2023 रोजी पुण्यातील बोधिसत्व चॅनलचे सागर कांबळे यांना तेलंगणा राज्याच्या पर्यटन विभागातर्फे तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील नागार्जुनसागर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ “बुद्धवनम” येथे बोधिसत्वाच्या ऐतिहासिक कार्या करिता गौरविण्यात आले. यावेळी बुद्धवनम प्रकल्पाचे विशेष अधिकारी श्री. मल्लेपाली लैक्मियाहा, विधान परिषद सदस्य श्री. देशपती श्रीनिवास, तेलंगणा ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अयाचितम श्रीधर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री. संदीप सुल्तानिया (IAS), माजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार डॉ. शिवनग्गी रेड्डी, दिल्ली लेडी श्री राम कॉलेजच्या प्राे. माया जोशी, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयचे प्रो. उपेंद्र राव आणि बुद्धवनमचे विशेष अधिकारी के सुधन रेड्डी, डॉ. श्याम सुंदर राव यांच्यासह महात्मा गांधी विद्यालय नलगोंडा येथील 150 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

बुद्धवनम या प्रकल्पाचे विशेष अधिकारी श्री. मल्लेपली लैक्मियाहा यांनी बोधिसत्वाच्या या कार्याचे नेहमीच कौतुक केले आहे आणि आंध्र, तेलंगणा येथे जेव्हां जेव्हां हे कार्य केले जाते तेव्हां त्यांनी शक्य तितके सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. हे कार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचावे हीच त्यांची इच्छा होती, त्यासाठी हा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन बोधिसत्व चॅनलचे सागर कांबळे यांना सन्मान करण्याचा मानस त्यांनी ठेवला होता. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री. संदीप सुल्तानिया (IAS) यांच्या मार्फत बोधिसत्वाच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि बुद्धवनमच्या चैत्य येथील सभागृहात सर्वांच्या उपस्थितीत सागर कांबळे यांचे कौतुक करून सन्मानपत्र देण्यात आले. मिस्टर. मल्लेपाली लैक्मियाहा आणि संपूर्ण बुद्धवमन सदस्यांचे सागर कांबळे यांनी मनापासून आभार व्यक्त करून सन्मान स्वीकारण्यात आला. यावेळी या सोहळ्याचे प्रसारण करण्यासाठी देशातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

यावेळी पुण्यातील बोधिसत्वाचे सहकारी आयु. मनोज गजभार व श्रद्धासंपन्न उपासक आयु. विशाल बेकुल्ले, आयु. अजित लोकरे आणि बोधिसत्व वाहिनीचे सागर कांबळे जाणार होते, पण काही कारणास्तव या सोहळ्यात फक्त मनोज गजभर आणि बोधिसत्व वाहिनीचे सागर कांबळे उपस्थित होते.
बोधिसत्व वाहिनीचे सागर कांबळे यांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान कोणा एका व्यक्तीचा नसून तुम्हा सर्वांचा आहे, ज्यांनी हे कार्य पुढे नेण्यासाठी कसल्याही परिस्थितीत साथ दिली. बोधिसत्वाच्या सर्व चाहत्यांच्या व सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे हे कार्य जंबुद्वीप मध्ये वाढत आहे, व नावारूपाला येत आहे. असे बोधिसत्व वाहिनीचे सागर कांबळे आणि मनोज गजभार यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!