महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांन सोबत.. अजित गव्हाणे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस मधे सुरू झाला. दोन्ही बाजूने सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार, की गैरहजर राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्याकरिता पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांना पाठिंबा दिल्याचा काल ठराव झाला आहे.

त्यानूसार शहरातील शहराध्यक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आज बुधवारी (दि. ५) सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

कोण कोण असेल दादांच्या बैठकीला

पिंपरी चिंचवडमधून अजितदादा पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, सुशील मंचरकर, विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, इखलास सय्यद, अक्षय माछरे, वर्षा जगताप, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!