महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

१८ ते २२ जुलैला होणार्‍या दवंडी यात्रेच्या नियोजनाची बैठक रविवारी दूपारी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात सकल मातंग समाजाच्यावतीने 18 जुलै ते 22 जुलै दवंडी यात्रा करण्याचे नियोजन ठरले आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासंदर्भात विचार विनिमय करून सहभागी होण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक ९जुलै २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता “साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर निगडी” या ठिकाणी आयोजित केली आहे.
या बैठकीस मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी आढागळे व संदीपानजी झोंबाडे तसेच आजी-माजी अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीसाठी मुंबईवरून सकल मातंग समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील सर्व मातंग समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी व सर्व पक्षातील मातंग समाजाचे पदाधिकारी शहरातील सर्व मातंग समाज बांधव कार्यकर्ते यांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी विनंती अण्णासाहेब कसबे अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व युवराज भगवान दाखले मा. अध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!