आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिर..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनाच्या निमित्ताने दि. 10 ते 15 जुलै 2023 दरम्यान मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर येत्या सोमवारी दि 10 जुलै पासून सुरू होत असून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या हाय-टेक इमारत पहिला मजला, प्लास्टिक शल्यचिकित्सा विभाग बाह्यरुग्ण विभाग OPD क्र 10 (बी) मध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वा यावेळत हे शिबिर होत आहे.
या शिबिरात भाजलेले रुग्ण, न भरणाऱ्या जखमा, नाक व कानाचे जन्मजात व्यंग, दुभंगलेले टाळू व ओठ, लायपोसक्शन, ब्रेस्ट इम्प्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, अपघातात कापलेले स्नायू व नस, व्रण, जबड्याचे फ्रॅक्चर, कारखान्यात झालेल्या हाताच्या जखमा व फ्रॅक्चर, भाजलेले रुग्णांचे मानेचे व हातांची सर्जरी, बेड सोर, ब्रेकियल प्लेक्सस इंजुरीच्या उपचारांबरोबर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. लहान मुलांमधील हात व चेहऱ्याच्या जन्मजात व्यंगावर विशेष मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा आपण विनामूल्य घेऊ शकणार आहात.
चिकित्सेसाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांनी येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे. या मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रुग्णानी येथील सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या प्लास्टिक शल्यचिकित्सा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी डॉ. उज्वला सोनवणे 9653509999, डॉ.संकल्प 7895307984 डॉ.अंकुर मोदी 9408773838 यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!