गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

जेजुरीचे मा. नगरसेवक मेहबूब पानसरे खून प्रकरणी पुण्यातून दोघा आरोपींना अटक..

प्रतिनिधी जेजुरी (तालुका पुरंदर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. नगरसेवक मेहबूब सय्यदलाल पानसरे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. वनीस प्रल्हाद परदेशी (राहणार गुरुवार पेठ पुणे मूळ राहणार ढालेवाडी तालुका पुरंदर ) आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेसी (वय 65 राहणार ढालेवाडी तालुका पुरंदर मूळ राहणार वाजेगाव तालुका फलटण ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेत जमिनीच्या जुन्या वादातून ढालेवाडी येथील माजी नगरसेवक पानसरे यांच्यावर (दि.७ शुक्रवार ) पाच जणांनी कुऱ्हाड आणि कोयताने वार केले होते. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी परदेशी सह पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी वणीस परदेशी आणि महादेव परदेशी हे दोघेजण डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, शंकर संपते, सचिन अहिवळे, सौदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदीप गाडे, पवन भोसले यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!