सैन्यदलातील हवालदार आहेर यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार..

प्रतिनिधी अजय विघे कोपरगाव, भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर (वय-४१) यांचे ९ जुलै रोजी सकाळी ४:१५ वा. पुणे येथील कमांड हाॅस्पिटल येथे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी वैकुंठ भुमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सेवानिवृत्ती काही दिवसांवर आली होती. त्यानंतर सैन्य दलातील नोकरी सोडून गावी स्थायिक व्हायचे होते. अशातच कोपरगाव तालुक्यातील हवालदार दिपक कृष्णा आहेर (वय ४१) आजारी पडले. त्यांच्यावर पुण्यातील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपण बळावत गेले आणि त्यातच त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह कोळपेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
सदर प्रसंगी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ दुकाने बंद ठेवून अंत्यसंस्कारा मध्ये सहभागी झाले महाराष्ट्र पोलीस दल व भारतीय लष्कराच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फेर्या झाडून बिगुल वाजवत हवालदार दिपक आहेर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी “मेजर दिपक आहेर अमर रहे, अमर रहे “भारत माता की जय” च्या घोषनांनीं परिसर दुमदुमून गेला होता.
भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर होते.
दरम्यान रविवारी सकाळी दिपक यांच्या निधनाची बातमी कळताच आहेर कुटुंबा बरोबर कोळपेवाडी ग्रांमस्थाना शोक अनावर झाला २००० साली सैन्य दलात दाखल होवून २३ वर्षे देश सेवा बजावत निवृत्तीस काही दिवस शिल्लक असतांना वयाच्या ४१ व्या वर्षी कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. पुणे येथून कोळपेवाडी शिवेवर पार्थिव दाखल झाल्या नंतर माजी सैनिक दलाच्या वतीने खांदा देवुन दिपक यांचे पार्थिव लष्कराच्या फूलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले होते. ट्रक पुढे,”ऐ मेरे वतन कें लोगो…”हे गीत भोंग्यावर वाजवले जात होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी दिपक यांना मानवंदना देत अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. बाजार तळावर उभारलेल्या मंडपात दिपक यांचे पार्थिव नागरिकांना अंत्य दर्शनासाठी ठेवले होते.
भारतीय सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोपरगांवचे तहसिलदार संदिपकुमार भोसले, मा. आ.अशोक काळे, जिल्हा मा. सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे, सुभेदार यमाजी चेहडे, कोपरगांव तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, कोपरगांव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे, सुभेदार मारुती कोपरे, संदिप कोळपकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, कोळपेवाडीचे सरपंच सुर्यभान कोळपे, सुरेगावाचे सरपंच शंशिकांत वाबळे, संजीवनीचे माजी संचालक निवृत्ती कोळपे आदिनी पुष्पचक्र अर्पण केले आहे.
सदर प्रसंगी अनेक मान्य वरांनी श्रध्दाजंली अर्पण केली आहे. हवालदार दिपक यांचे पार्थिवावर ठेवण्यात आलेला राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज पत्नी कांचन यांचेकडे सुपुर्द करण्यात आला मुलगा साहिल आहेर याने हवालदार दिपक यांचे पार्थिवाला अग्नीडाग दिला आहे. सदर प्रसंगी सुत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.




