गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

रूपीनगर मधील वाहनांची तोडफोड करणार्‍या कोयता गॅंगची चिखली पोलिसांनी काढली धिंड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोयत्याची दहशत अधिकच वाढत चालली आहे. अशामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुपीनगर परिसरात किरकोळ कारणावरून व्यवसायिकला कोयत्याने मारहाण करत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

या प्रकरणातील आरोपींना चिखली पोलिसांनी अटक करत त्यांची धिंड काढली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. रुपीनगरच्या ज्या परिसरात या गावगुंडांनी कोयत्याने व्यवसायिकाला मारहाण करून वाहनांची तोडफोड केली होती. अगदी त्याच परिसरात चिखली पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढली. गावगुंडांना कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. चिखली परिसरातील नागरिकांमध्ये असलेली गावगुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस ॲक्शनमोड मध्ये आले आहेत. कायदा हातात घेणाऱ्या प्रत्येक गाव गुंडांवर कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा संदेश चिखली पोलिसांनी या निमित्ताने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!