चिंचवड येथे १६ जुलै रोजी श्री. संत शिरोमणी सावता संजीवन समाधी सोहळा होणार!

पिंपरी – ( प्रतिनिधी )चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने रविवार दि. १६ जुलै रोजी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे “श्री. संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा” संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवडे लॉन्स येथे सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यास अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू/ उपाध्यक्ष मा. एकनाथ खेडकर, संसद महारत्न खासदार मा श्रीरंग ( आप्पा ) बारणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मा लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंके, वाकड विभाग प्रमुख नवनाथ कुदळे, वाल्हेकरवाडी विभाग प्रमुख वैजनाथ माळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यास माळी समाज बांधवांनी या कार्यक्रमास आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्री. माळी यांनी केले.



