कोविड १९ प्रतिबंधात्मक लस ६० वर्षे व पुढील नागरिकांना ‘इन्कोव्हॅक’ लसीचा प्रिकॉशन डोस नाकावाटे देण्यास सूरूवात झाली.

प्रतिनिधी-पिंपरी, दि. २९ एप्रिल २०२३:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मा. उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालय पुणे मंडळ यांचेकडून कोविड १९ प्रतिबंधात्मक ‘इन्कोव्हॅक’ लसीचे ३३६ डोस प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निश्चित केलेल्या ०८ लसीकरण केंद्रावर दि. २९ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध लसीच्या साठयानुसार शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांनुसार वय वर्षे ६० व पुढील नागरिकांना ‘इन्कोव्हॅक’ लसीचा प्रिकॉशन डोस नाकावाटे (ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या
दूसर्या डोस नंतर ६ महिने किंवा २६ आठवडयाचा कालावधी पुर्ण झालेला आहे.) यांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पध्दतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड, नवीन थेरगांव रुग्णालय, थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग, रुम नं. ६२ या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागामार्फत शहरामधील वय वर्षे ६० व पुढील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, (ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुसया डोस नंतर ६ महिने किंवा २६ आठवडयाचा कालावधी पुर्ण झालेला आहे.) त्यांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक ‘इन्कोव्हॅक’ चे लसीकरण महापालिकेच्या ०८ लसीकरण केंद्रावर करण्यात येत असून यांचा लाभ घ्यावा असे डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगीतले.




