
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मुरबाड (ठाणे)येथून मुंढवा पुण्याकडे द्रवरुप ऑक्सिजन वाहतुक करणारा केए-०१-एडी-९८३० असा वाहन क्रमांक असलेला टॅंकर निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या अलीकडे रस्ता दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन पथक ,आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस पथक घटनास्थळीं दाखल झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही गॅस गळती झाल्याचे दिसून आढळून आले नाही .पोलीस ,अग्निशमन विभाग,आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी कार्यरत आहे. सदर वाहनातील ऑक्सिजन रिकव्हरीसाठी तळोजा येथून वाहन मागविण्यात आले आहे. सदर कंपनीचे तांत्रिक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत . आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे घटनास्थळी उपस्थित आहेत.
सदर वाहनातील हेल्पर सुखदेवसिंह चौहान वय 48 वर्षे जखमी असून त्यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.





