देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज भरण्याची मूदत वाढवली. आयुक्त शेखर सिंह

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. २७ जुलै २०२३ केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे योजना राबविण्यात येत असुन सदर प्रकल्पाकरिता अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यासाठी २८ जुलै २०२३ रोजी पर्यंत जाहीर प्रकटनाद्वारे मुदत देण्यात आलेली होती.

त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इ. कागदपत्रे मिळणेकामी नागरीकांना लागणारा विलंब लक्षात घेता सदर प्रकल्पांतर्गत नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी १२ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!