महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

भिमजयंती साजरी केली म्हणून झालेली हत्या हा मुद्दा अधिवेशनात मांडण्या सारखा नाही का? ..मनोज गरबडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ जूलै २०२३ अक्षय भालेराव हत्याकांडावर एकही आमदार आठ दिवस झालेत पावसाळी अधिवेशनात बोलू शकला नाही. भिमजयंती केली म्हणून झालेली हत्या हा मुद्दा यांना वाटत नाही का?
निवडणुकीच्या काळात निळे रुमाल गळ्यात घालून येणाऱ्यांना आंबेडकरी जनतेने ओळखले पाहिजे. बदलेल्या शिवसेनेला, दलित राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या काँग्रेसला, ढोंगी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि संविधान हटवायला निघालेल्या भाजपाला समाजाने ओळखावे.
जातीयवादी भाजपला रोखायचे आहे म्हणणाऱ्या या सर्व पक्षात आणि भाजप मध्ये फरक काय?
मटणाच्या बोट्यासाठी, कागदी नोटासाठी आणि दारूच्या घोटासाठी आपण लोकशाहीला धोक्यात आणत आहोत का ? आमिषांना बळी पडून येणार्‍या पिढीच्या भविष्याची राख रांगोळी करत आहोत.
आता जो आमच्या मुद्द्यांचा नाही तो आमचा नाही ही भूमिका घेतली पाहिजे.
अक्षय भालेराव हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला, राज्यभर हजारो मोर्चे झाले, विरोधकांना सरकारला या मुद्द्यांवर घेरायला लाज वाटते का? निवडणुकीत या सर्वांचा बाजार उठवल्याशिवाय बाबासाहेबांचा सैनिक शांत बसणार नाही!
विचार करा या सभागृहात बा भिमाचा एखादा सैनिक असता तर त्याने या व्यवस्थेला सळो की पळो केलं असतं…
असे मनोज गरबडे यांनी पिंपरी येथे पावसाळी अधिवेशनावर चर्चा करतांना सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!