महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिं. चिं. म.न.पा.च्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. ३ ऑगस्ट २०२३ क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत चळवळीचे नेतृत्व करणारे थोर स्वातंत्र्य सैनिक होते, इंग्रजांविरुद्ध देशप्रेमी युवकांची मोठी फौज उभी करून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली, त्यांच्या या कार्यामुळे त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाते. आपले सामाजिक कार्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही चालू ठेवून त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून लोकोपयोगी अनेक कामे केली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, यावेळी अतिरिक्त आयुक्त जगताप बोलत होते.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता सुभाष काळे, मुख्य लिपिक वसिम कुरेशी तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजी राजवटीत प्रतिसरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वस्तात अन्न धान्य पुरवठा, लोक न्यायालय, बाजार व्यवस्था तसेच युद्ध शाळा सुरू केली. त्यामध्ये देशप्रेमी युवकांना युद्ध कलेचे प्रशिक्षण दिले गेले. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले असे सांगून क्रांतिसिंह नाना पाटील हे संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार होते असेही जगताप म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!