जागतीक पॅरा अथेलिक्स स्पर्धा २०२५ गोल्ड मेडल विजेते निषाध, सिमरन भारताला अन्य दोन मेडल प्रीती पाल, प्रदीप कुमार..

प्रतीनीधी सतिश पाटील मुंबई दि. ०७ ऑक्टोबर २०२५ धावण्याची शर्यत जिंकताना ११.९५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दिली. गेल्या वर्षी सिमरन २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक विजेती होती. पॅरिस पॉरालिम्पिक स्पर्धेत ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. चीनची लियांग यानफेन रौप्य, तर स्पेनची नागोर फोलगाडो कांस्यपदकाची मानकरी ठरली.
निषादने आपल्या २६व्या वाढदिवशी पुरुषांच्या ‘टी ४७’ विभागात उंच उडीत सोनेरी यश मिळविले. त्याने २.१४ मीटरच्या आशियाई विक्रमासह हे यश संपादन केले. त्याने टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रत्येकी एक रौप्य, २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक कांस्य आणि २०२३ च्या आवृत्तीत एक रौप्यपदक मिळविले होते.
महिलांच्या ‘टी ३५’ विभागात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीती ३०.३३ सेकंद या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. चीनच्या गुओ कियानकियान हिने २९.५० सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळवले. इराकच्या फातिमा सुवेदला रौप्यपदक मिळाले.
पुरुषांच्या ‘एफ ६४’ विभागातील थाळीफेक प्रकारात प्रदीपने (४६.३३ मीटर) कांस्यपदक मिळवले. क्रोएशियाचा इव्हान कॅटानुसिक (५५.१२ मीटर) सुवर्णपदकाचा, तर अमेरिकेचा मॅक्स रोहन रौप्यपदकाचा मानकरी ठरला.



