देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

स्वातंत्र्यदिन चिरायू व्होवो.. इंदिरा कल्याण केंद्र खडकी कॅन्टोन्मेंट विभागामध्ये १५ ऑगस्ट साजरा.

प्रतिनिधी खडकी सालाबादा प्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट विभागामध्ये इंदिरा कल्याण केंद्र या संस्थेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट हा खूप उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विविध मनोरंजक व शालेय विद्यार्थ्यांसाठी करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरा कल्याण केंद्र या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यशील सदस्य यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढील प्रमाणे इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष मा. हाजी समीर चौधरी त्याचप्रमाणे अजहर खान, सईद शेख, जहीर शेख, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते जफर चौधरी, मेहबूब पिरजादे, हारुण सय्यद, आसिफ चौधरी, आजम खान, रफीक शेख ( टेलर ), जाकीर शेख, नईम शेख, जुनैद चौधरी, आयाज चौधरी, नासिर पटेल, फारुख शेख, नासिर कुरेशी, मुक्तार कुरेशी, इमरान शेख, हाजी शकील कुरेशी, भरत ठाकूर, रवि गायकवाड, गणेश कांबळे, संजय आठवले, अनिल दवंडे, अनिल सोनवणे.
या कार्यक्रमात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मा. दुर्योधन भापकर साहेब उपस्थित होते, तसेच जामा मस्जिद खडकी यांचे जमातुल मुस्लिमीनची गेल्या दोन महिन्यापूर्वी निवडणूक पार पडली आणि यामध्ये बहुमताने निवडून आलेले अध्यक्ष हाजी हसन इब्राहिम कुरेशी आणि सर्व विजयी उमेदवार यांचा संस्थेच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अभिनेता सोहेल कुरेशी आणि प्रसिद्ध मांडव उद्योजक हाजी हुसेन कुरेशी यांचे विशेष सहकार्य लाभले होते. लहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम यात जूनियर अमिताभ बच्चन जूनियर मेहमूद आणि जादूगार शाम कुमार यांनी लहान मुलांचे मनोरंजन केले. तसेच नेहमी प्रमाणे याही वर्षी ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाॅल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!