प्रा.बी. बी. शिंदे यांना “भीमशक्ती जीवन गौरव पुरस्कार” जाहीर- सुरज गायकवाड

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. १० ऑक्टोंबर २०२३ शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांच्या चळवळीमध्ये सातत्याने काम करून समाजासाठी दिलेल्या योगदाना बद्दल प्रा .बी. बी. शिंदे यांना “भीमशक्ती जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झाला असल्याची माहिती भिम शक्ती संघटनेचे मुख्य आयोजक व अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा आयु. सुरज गायकवाड यांनी सांगीतले.
प्रा .बी. बी. शिंदे हे सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना (महा. राज्य.)चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची माहिती देताना सुरज गायकवाड यांनी सांगीतले की आयु. बन्सी भिवाजी शिंदे (प्रा. बी. बी. शिंदे) रा. बालाजीनगर, भोसरी, पुणे शिक्षण एम. ए. राज्यशास्त्र १९८०, जन्म तारीख ३०/१२/१९५२ पूर्ण वेळ समाज कार्य करतात.
शिंदे यांचा ज्या संस्थाशी / पक्षाशी संबंध आला त्यांची नांवे खालिल प्रमाणे १) संत कबीर मित्र मंडळ, २) बहुजन भिम सेना, ३)भारतीय बहुजन सेना, ४) वस्ती विकास समिती, ५) वर्ल्ड विजन नेटवर्क ऑफ केअर, ६) बहुजन समाज पक्ष, ७) बाम सेफ, ८) मुळनिवाशी संघ, ९) सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजीक संघटना १०) काँग्रेस पक्ष, ११) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काॅंग्रेस झोपडपट्टी सेल अध्यक्ष. तसेच समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्ये पूर्ण काम केले त्याचा तपशील या प्रमाणे आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मीक, आरोग्य, इत्यादी सर्व प्रकारात कामाचा अनुभव आहे.
तसेच माता रमाई आवास योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राबवली जावी, म्हणून उपोषणे, धरणे आंदोलने करूण समाज जागृती आणि म. न.पा. कडे सततचा पाठपुरावा करण्याची क्षमता असलेले व्यक्ती महत्व म्हणून समाज पहात असतो.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा’ व आंबेडकरी चळवळी मध्ये कार्यरत कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतजी हांडोरे (माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व कायम निमंत्रित सदस्य, काँग्रेस वर्किंग कमिटी), मा. बाळासाहेब शिरसाट (मा.सभापती सातारा जिल्हा परिषद व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भीमशक्ती सामाजिक संघटना व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी), आयु. अनिल उचाळे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमशक्ती विद्याथी आघाडी) मुख्य आयोजक सुरज गायकवाड (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा भीमशक्ती विद्याथी आघाडी) आयु. गौतम गायकवाड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (पुणे जिल्हा प्रमुख) आयु. प्रा. युवराज भास्कर तिकटे असे प्रमूख उपस्थितीत असणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. सूरू होईल कार्यक्रमाचे स्थळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ बाबासाहेब आंबेडकर (भिमसृष्ठी) पुतळ्या शेजारी पिंपरी पूणे. १८ येथे असेल कार्यक्रमाचे निमंत्रक भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते.
शिव, फुले, शाहु, आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत सर्व धम्म बांधवांनी उपस्थित रहावे असे सुरज गायकवाड यांनी या वेळी सांगीतले.




