पीएमआरडीए प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून अर्थपूर्ण व्यवहाराकरीता बिल्डरांच्या हिताचा निर्णय घेतला.. मारुती भापकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२५/८/२०२३ भक्ती शक्ती समूहशिल्पालगेचच्या जागेबाबत मा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पीएमआरडीए प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करून पेठ क्र.२४ ही संपूर्ण जागा सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव करावी या आशयाचे पत्र आज उप मूख्यमंत्री अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवडला आले असता मारुती भापकर व सर्व पक्षीय टीमने दिले.
सोमवार दि.२१/८/२०२३रोजी पी. एम. आर. डी. ए. चे आयुक्त राहुल महिवाल यांनी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर व अन्य विविध संस्थांनी पेठ क्र. २४ मध्ये भक्ती शक्ती चौक, निगडी येथील वाणिज्य भूखंडामधील जागा शिवजयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, विविध जयंती महोत्सव तसेच निगडी ग्रामस्थांच्या गावजत्रांकरीता मिळणेकामी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मागणी केली होती. तथापि, सदर जागेमधील ५ वाणिज्य भूखंडांची ई-लिलावाद्वारे वाटप प्रक्रीया पूर्ण झाल्याने सदरील व्यापारी भूखंडाची जागा या मागणीनुसार देणे शक्य होणार नसल्याचे वेळोवेळी संबंधितांना कळविण्यात आले आहे. तथापि, या परिसरातील लोकप्रतिनिधी व विविध संस्थांच्या मागणीचा विचार करुन, पेठ क्र. २१, निगडी गावठाणाला लागून असलेली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यातील खुली जागा क्र. ९ निगडी, सर्व्हे नं. ८३ मधील एक एकर (४० आर.) एवढे क्षेत्र मागणीनुसार सार्वजनिक वापराकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना दि. १८/०८/२०२३ रोजी हस्तांतरीत करणेत आलेले आहे. सदर जागेचा विविध संघटनांनी शिवजयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, विविध जयंती महोत्सव तसेच निगडी ग्रामस्थांच्या गावजत्रांकरीता वापर करावा असे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देणेत आलेले आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पर्यायी जागा मंजूर केल्याने विविध संस्थांच्या सदर जागा मागणीला दिलासा मिळाला आहे. असे महिवाल यांनी पत्र प्रसिद्धस दिले आहे. या निर्णयाद्वारे जी पेठ क्र.२१ जागा क्र.९ निगडी सर्वे नं.८३ मधील एक एकराची पर्याय जागा सार्वजनिक उपक्रमाकरिता देण्याचा निर्णय पीएमआरडीएने जाहीर केला आहे. ही जागा भक्ती शक्ती शिल्पसमूह व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून दूर अडगळीत लोकवस्तीत जागा असून ज्या उदात्त उद्देशासाठी ही जागा देऊ केली आहे. तो उद्देश बिलकुल यशस्वी होऊच शकणार नाही. तसेच आम्ही मागणी करीत असलेल्या भूखंड बाबत संबंधितांना वेळोवेळी कळवले हे जे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे ते सपशेल खोटे असून अशी आमची श्री. महिवाल यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे महिवाल यांचा हा निर्णय पिंपरी चिंचवडकरांची फसवणूक करणारा आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा प्रकार म्हटले पाहिजे. श्री. महिवाल यांनी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर न मांडता केवळ बिल्डर धारजींनी मांडणी करून मा. मुख्यमंत्र्याची दिशाभूल करून हा निर्णय मनमानी पद्धतीने बिल्डरांचे हित डोळ्यासमोर ठेवून अर्थपूर्ण व्यवहार करुन घेतलेला आहे . या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. आपण स्वतः लक्ष घालून पीएमआरडी आयुक्त श्री राहुल महिवाल यांनी दि.१८/८/२०२३ रोजी घेतलेला वरील निर्णय आम्हाला बिलकुल मान्य नसून हा निर्णय आपण लक्ष घालून तातडीने रद्द करावा. व आमच्या मागणीप्रमाणे भक्ती शक्ती समोर शिल्पालगतचा पेठ क्र.२४ हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उपक्रमाकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा. जर आपण तसा निर्णय घेतला नाही तर आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करावी लागेल असे ही यात लिहिले गेले आहे.
भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, सामाजिक संघटना, संस्था, सर्व राजकीय पक्ष. मारुती भापकर,अण्णासाहेब कसबे, भाऊसाहेब आढागळे, युवराज कोकाटे, नकुल भोईर, प्रदीप पवार, धनाजी यळकर, पाटील शिवाजी साळवे, सतीश काळे, ब्रह्मानंद जाधव. अशा सर्व सामाजिक राजकिय संस्थाच्या पदाधिकार्यांच्या सहीचे हे पत्र आज उप मूख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांच्या नियोजित पिंपरी चिंचवड दौर्या दरम्यान समक्ष भेटून देण्यात आले.





