मनपा प्रशासन शहर फेरीवाला कायदयाची अंमलबजावणी का करत नाही.. प्रल्हाद कांबळे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ ऑगस्ट २०२३ उपरोक्त विषयान्वये फेरीवाला समितीने उपमूख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती निवेदन दिले आहे, पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक, टपरीधारक यांचा सर्व्हे करण्यात आला होता. परंतु सर्व्हे नंतर फेरीवाल्या धोरणाची अंमलबजावणी कायदावरच राहून गेली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत दिशाभुल केली जात आहे. शहर फेरीवाल्या सदस्य कमिटीची वर्षानुवर्षे मिटींग होत नाही.
फेरीवाले यांचा सर्व्हे झाल्यानंतर लायसेन्स / ओळखपत्र महानगपालिकेने देणे बंधनकारक असल्याने याची अंमलबजावणी आजतागायत झालेली दिसून येत नाही.
माहे डिसेंबर २०२२ मध्ये ठेकेदारांमार्फत फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये अनेक फेरीवाले, हातगाडी धारक, पथारीवाले वंचित राहिलेले आहेत. या संदर्भात केणताही निर्णय आजतागायत घेण्यात आलेला नाही. एकीकडे हॉकर्स झोन तयार करण्याचे स्वप्न दाखवुन आमची दिशाभुल केली जात असल्याने, याचा जाब विचारल्यास पिंपरी चिंचवड महानगरपलिकेतील संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी हे आम्हांस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शहर फेरीवाल्या धोरणावरील कायदयाचा नागरिकांच्या मनातून विश्वास उडालेला आहे. या संदर्भात शहर फेरीवाल्या सदस्यांची मा. आयुक्त साहेब, फेरीवाला कमिटी अध्यक्षेतेखाली इतर समस्या बाबत लवकरात लवकर मिटींग घेवुन मार्ग काढावा व गेल्या १४ वर्षापासून कागदावर फेरीवाल्यांना स्वप्न दखविण्यात येते. मात्र हक्काच्या गाळ्यांपासून फेरीवाल्यांना वंचित रहावे लागत आहे. यावर आपण काही तरी उपाय शोधावा या विषयाचे पत्र फेरीवाला समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी उपमूख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या दौर्या दरम्यान समक्ष भेटून देण्यात आले या वेळी फेरीवाला समिती सदस्य ही उपस्थित होते.



