महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

हॉटेल मालकांनी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण मागे पण ०४ महिने झाले तरी मागण्या अपूर्णच? म्हणून पून्हा उपोषणाचा दे धक्का..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २७ ऑगस्ट २०२३ श्री. नितिन बाबुराव दुनधव यांनी सर्व पीडित कामगारांच्या वतीने दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासुन मॉईड स्पेस हॉटेल अँड रिसॉर्ट्स प्रा.लि. ४७०० कमला क्रॉस रोड पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन समोर पिंपरी ४११०१८. यांच्या विरोधात आमरण उपोषण केले होते. दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी श्री. शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन व श्री. अमोल थोरात भाजप कार्यकर्ता यांच्या मध्यस्थितीने आमरण उपोषन मागे घेण्यात आले होते. हॉटेलचे मालक श्री. प्रशांत भंडारी यांनी तीन ते चार दिवसात सर्व कामगारांच्या मागण्या पुर्ण करतो. असे तोंडी आश्वासन दिल्यामुळे आमरण उपोषण मागे घेतले होते. पंरतु आज ०४ महिने झाले सर्व कामगारांना क्लेअरन्स दिलेला नाही. आम्हांला रोज फोन वर सांगीतले जाते की प्रशांत भंडारीसर दिल्लीला गेले आहेत. पुढच्या आठवडयात होईल असे करता करता आज ०४ महिने झालेले आहेत. मालक श्री. प्रशांत भंडारी यांनी सर्व वेंडर व सर्व अमराठी लोकांचे क्लेअरन्स त्यानां बोलावुन पैसे दिले. आम्ही २० कामगार हे दलित आहोत, गरीब आहोत. कदाचित याच कारणाने ते आम्हांला क्लेअरन्स करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. जेव्हां जेव्हां आम्ही त्यांना फोन करतो. तेव्हां ते फोन पण उचलत नाही. त्यानी अमरण उपोषण करणारे नितीन दूनघव यांचा फोन नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आहे. नितीनच्या घरची परिस्थिती ही खुप हलाकिची झाली आहे. त्यांच्या भावाला ब्लड कॅन्सर व आईचे स्पाईनचे ऑपरेशन झाले आहे. आमचे मालक व त्यांच्या सहकार्यांना फोन केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच सर्व कामगार मित्रांच्या घरची परिस्थिती देखील खूप हलाकीची आहे. कर्जबाजरीपणा मुळे आत्महत्या करण्याची वेळ आमच्या मालकांनी आज आमच्यावर आणली आहे.
आम्ही सर्व कामगार दलित आहोत, आम्ही हॉटेल मध्ये १३ ते १५ वर्ष काम केले. लेबर कोर्टात ही केस केली, परंतु आम्हांला कोठेही न्याय मिळाला नाही. आम्ही जे एप्रिल २०२३ मध्ये आमरण उपोषण केले होते ते आम्हाला खोटे आश्वासन देऊन मोडले. आज ०४ महिने झाले तरी श्री. प्रशांत भंडारी यांनी आम्हांला आमचा ०४ वर्षाचा पगार, बोनस, लिव्ह इनकॅशमेन्ट आणि व्ही. आर. एस. देणे बाकी आहे.
आम्हा गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणुन आम्ही पून्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक येथे (भिमसृष्टी) याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन दिनांक १८ ऑगस्ट २०२३ पासून ते मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू केले आहे. आणि आज आंदोलनाचा दहावा दिवस आहे.
आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून आपण आम्हास मदत करावी ही कळकळीची विनंती आहे. असे आंदोलन करते शैलेश आव्हाड यांनी यावेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!