मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड ०३ सप्टेंबर २०२३ काल जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी राजन नायर यांनी आपले विचार मांडतांना सांगीतले देवेंद्र फडणवीस यांच्या कडून राज्यातील प्रत्येक आंदोलन सातत्याने दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या सरकारने दिव्यांग, असो वारकरी, विद्यार्थी आणि आता मराठा आंदोलक यांच्यावर पोलिसांकरवी हल्ला करवून हुकुमशाहीचे दाखले राज्याला दिले आहेत. मराठा आरक्षण मागण्यासाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने शेकडो आंदोलन झालीत त्यात लाखोंच्या संखेने आंदोलक यापूर्वी देखील आले आहेत परंतु लाखोंच्या संख्येने जमलेले मराठा बांधव यांनी कधी त्या मोर्चाला गालबोट लावल्याचे प्रकार या महाराष्ट्रात घडलेला नाही. काल झालेल्या घटनेसाठी सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून सरकारी यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचे प्रकार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करत असल्याची टीका राजन नायर यांनी यावेळी केली,


प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, आंदोलकांवर केलेला हल्ला निषेधार्थ आहे. शहरातील आमदारांनी या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे होते. मात्र भाजपा आमदार हे त्यांच्या नेत्यांच्या एवढे दडपणाखाली आहेत की साधा निषेध करायला हि ते धजावत नाहीत. येणाऱ्या काळात शहरातील मराठा समाज याच उत्तर मतदानाच्या माध्यमातुन नक्की देईल.
कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान , व लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्यावर दडपशाही करण्याचे प्रकार भाजपच्या काळात वाढले असून भाजपा व फडणवीस यांच्या सरकारने न टिकणारे मराठा आरक्षण देऊन दिशाभूल केली. कालचे जालना येथील मराठा आंदोलन राज्यात वनवा पेटवणार, म्हणून त्यांना भीती होती त्यामुळेच लाठीचार्ज केला मात्र आता सरकारला राज्यातील जनता माफ करणार नाही –
पिंपरी चिंचवड ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष भाई विशाल जाधव म्हणाले मराठा समाज हा काळानुसार ओबीसी व बारा बलुतेदार समाजाचा पाठीराखा म्हणून काम करत आहे. त्यांना आरक्षण मिळणे हा संविधानिक हक्क आहे त्यांचा हक्क कोणी टाळू शकणार नाही परंतु काल झालेल्या जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन चिरडण्याचा जो प्रकार झाला आहे. त्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस राजन नायर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, फेरीवाला हॉकर्स महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद कांबळे, संदीप चव्हाण, अनिल भोसले, शिवाजी पाडाळे, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर सरचिटणीस विकास कांबळे रजनीकांत गायकवाड मयूर खरात, अमोल बेंद्रे शाहिद शेख पियूष अंकुश, स्वप्नाली आसोले, बिरुदास मोटे, काशिनाथ जगताप, राजेश हरगुडे, नितीन मोटे, संदीप पाटील, सलीम डांगे, योगेश सोनवणे, हृषिकेश गराडे, विशाल क्षीरसागर, नितीन मोरे, विशाल शिंदे, उज्वला वॉशिंगे, वैभव जाधव, अल्ताफ शेख, संजीवनी पुराणिक, युवराज लोकरे, विशाल शिंदे आणि मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर संघटेनेचे पदाधिकारी ही उपस्थित होते.



