आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

आम्ही करदाते आपले आव्हान स्विकारतो, पण एवढच करा… जनतेच्या व्यथा!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १२ मे २०२६ इच्छा शक्ती असेल तर खरच खूप काही करता येईल! पारदर्शक, कर्जबुडवे, भ्रष्टाचारी, बलात्कारी, देशद्रोही, नेत्यांना फुकटची पेन्शन, इंधन, फोन, ड्रायव्हर, वाहन, बंगला, परदेश दौरा अशा अनेक सुविधांची पुर्ण कपात केली तर करोडोचा खर्च येथेच वाचेल.
जेल मधिल आपराधी आपण अनेक वर्ष पोसत बसने, गुन्हेगार आपला असेल तर क्लिनचिट मग कितीही मोठा अपराधी असो त्याला जामिनावर बाहेर काढला जातो, टेलिकॉम, इंटरनेट, मेडिसिन, हॉस्पिटल, पॉलिसी, खाजगी शाळा, दिवसे दिवस वाढीव टोल, टॅक्स, वाहन आरटीओ सरकारी कामकाज जाचक अटी शर्ती पैसे देवून ही वीज कंपनी वाढीव आकार व मनमानी कारभार यावर सरकारणे अंकुश ठेवायाला हवा. मनमानी कारभार थांबवला पाहिजे. मतदान डोळ्यासमोर ठेवून दिलेली चिरीमिरी बंद व्हायला हवी. पाच किलो राशनची भिक देवून सरकार दुसरी कडे भरघोस वाढ करून तिजोरी भरते तो पैसा कोठे व कशावर खर्च होतो याची पारदर्शकता असायला हवी किती आले किती गेले कोठे गेले व शेवटी किती उरले याचा लेखाजोखा सर्वसामान्यांन पर्यंत यायला हवा तरच होईल भ्रष्टाचार मुक्त कारभार! यातून ही कोणी भ्रष्टाचार करून सापडला तर त्याची गय न करता प्रथम पदमुक्त करा मग जेल मधे टाका मगच आपण जनतेला सल्ला द्या.
सर्व भ्रष्टाचारी, बलात्कारी, गंभीर अपराधी यांना आपणच नेते पद देवून मंत्री बनवून सत्तेत बसवले त्यांची जागा जेल मधे होती. असे अनेक विरोधी पक्षाचे नेते आपण मांडीवर घेऊन बसलात कसे? अशाने भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ कारभार, पारदर्शकता कशी येणार पंतप्रधान साहेब तुम्हीच उत्तर द्या!
साल २०१४ पर्यंत आम्ही खरच तुमचे चाहते होतो कारण विरोधात असताना आपण प्रत्येक भाषणात पारदर्शी कारभार, भ्रष्टाचार मुक्त सरकार, अपराधी, महागाई, रोजगार, जगात एक नंबर, डॉलर व रुपयातिल फरक, नवीन युनिव्हर्सिटी, आयआयटी, स्वास्थ, शिक्षण मोफत वा अल्पदरात, स्वच्छ भारत, पेट्रोल, डिझेल, सिलेंडर आर्धा किंमतीत, सबका साथ सबका विकास, हवाई चप्पल वाला हवाई जहाज मे सफर करेगा गरिबी नष्ट करू, शेतकर्‍याना हमी भाव देवू, वीज व पाणी, खते, बियाने, अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण फ्री देवून भारत देश जगातील एक नवा शेतीप्रधान देश बनवू, शेतीकर्ज, सुविधा यावर अशी अनेक जाहीर आश्वासने दिली त्याच्यातली अश्वासनांची किती पूर्तता आपण आजपर्यंत केली याचे उत्तर द्या माननीय पंतप्रधान साहेब देश आपल्या कडे आशेने पाहत आहेत, मागच्या सरकारने देश लुटला असे आपणच बोलला होतात मग आज देशावर 197.18 लाख करोड रू. कर्ज वाढवून ठेवले कोणी. प्रत्येक नागरीकाच्या डोक्यावर अंदाजे नव्वद हजार ते एक लाख रू.कर्ज बसवले आहे. मागील सरकारमध्ये 2013 मधे देशावर अंदाजे 55.87 लाख कर्ज होते. आज पर्यंत ते कमी करण्या ऐवजी भरमसाठ वाढ झाली आहे. जीडीपी तर उच्चं स्तरावर आहे. आता कधी तुमचे ते अच्छे दिन 140 कोटी भारतवासीयांना बघायला मिळतील का??? जर जुने सरकार भ्रष्टाचारी होते तर मग आजपर्यंत आपल्या सरकारात देशावर कर्ज वाढले कसे आणि का वाढत आहे. भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी सरकार म्हणून भाषणात बोलत असता, प्रत्येक्षात कधी उतरनार आपण जनतेला उपदेश देता काटकसर करा. सुरवात तुमच्या कडूनच करा कशाला पाहीजे व्हीआयपी सुविधा सर्व राजकारणी लोकांना ते सेवा करतात का भरघोस पगार घेऊन सत्तेचा उपभोग घेत आहेत कधी सामान्य जनतेचे प्रश्न व समस्या निवाकारण केलेले दिसून येत नाही? असे बरेच नेते फक्त पद व पगार घेत आहेत, नॉट रिचेबल असतात, बघा त्यांची उपस्थिती मस्टर वरती किती असते ते? हा जनतेच्या खिशातील पैसा विनाकारण वाया जात नाही का??? असो शेवटी इतकेच बोलतो बाकी सब चंगाशी बोलाव लागेल! एक भारतीय करदाता, मतदार प्रश्न विचारत आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!