गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

१५ तोळे सोन्याची चैन जबरीने हिसकावलेल्या चोरीच्या गुन्हयाची चाकण पोलीसांकडुन १२ तासात उकल..

प्रतिनिधी चाकण दि.०३ सप्टेंबर २०२३ मारहाण करून गळयातील १५ तोळे सोन्याची चैन जबरीने हिसकावुन चोरीचे गुन्हयाची चाकण पोलीसांकडुन अवघ्या १२ तासात उकल करत तीन सराईतांना अटक करून त्यांचे कडुन सोन्याची चैन सह ३,७०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत.
दिनांक ०१/०९/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे हजर होवुन फिर्यादी सतीष कुंडलीक गव्हाणे, वय ५७
वर्षे, धंदा हॉटेल, रा. पाटीलवाडी कोरेगाव भिमा ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली की, बहुळ गावचे हद्दीत चाकण शिक्रापुर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवर येवुन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पी.व्ही.सी. पाईपने मारहाण करून फिर्यादी सतीष गव्हाणे यांचे गळयातील १५ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसकावुन चोरून मोटार सायकल वरून पळुन गेले आहेत. फिर्यादी यांचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं ६९८ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे व.पो.नि श्री. वैभव शिंगारे यांनी तसेच चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांनी सदर गुन्हा उघडकीय आणण्याचे अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले.

डी. बी. पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावरील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडुन घटनेची सविस्तर माहिती घेतली, तसेच सदर गुन्हयाचे घटनास्थळ परीसरात तांत्रिक तपास करून चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाचे स.पो.नि. विक्रम गायकवाड व पो.ना. हनुमंत कांबळे, पो.कॉ. प्रदिप राळे, पो.कॉ. निखील वर्पे यांचे पथकाने कसोशीने तपास करून खेड, होलेवाडी
टाकळकरवाडी तसेच वाकी बु॥ येथे सापळा रचुन अतिशय शिताफीने आरोपी नामे १) श्रीराम संतोष होले, वय २५ वर्षे, रा. होलेवाडी ता. खेड जि. पुणे, २) प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर वय २१ वर्षे, रा. टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे, ३) बबलु रमेश टोपे, वय २३ वर्षे, रा. वाकी बु. ता. खेड जि. पुणे यांना ताब्यात घेतले त्यावेळी वरील आरोपींचे ताब्यातुन सदर गुन्हयातील फिर्यादी यांची चोरी केलेली सोन्याची चैन, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण ३,७०,०००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वरील अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापूर्वी चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयात वरील आरोपी तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असुन त्यांची दिनांक ०५/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पो.उ.नि. विनोद शेंडकर, पो.उ.नि. सागर बामणे, पो.स.ई. अभिजीत चौगुले, स.फौ. सुरेश हिंगे, पो. हवा. राजु जाधव, संदिप सोनवणे, पो.ना. हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, पो.कॉ. नितीन गुंजाळ, निखील वर्पे, प्रदिप राळे,
सुनिल भागवत, संदिप गंगावणे, मंगेश फापाळे महेश कोळी, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई विनोद शेंडकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!