महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भक्ती शक्ती लगतची जागा सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवावी..मारुती भापकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती लगतची पी. एम. आर. डी. ए. ने बिल्डरांना विकलेली जागा सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवावी या मागणीसाठी समिती व पिंपरी चिंचवडकर नागरिकांच्या वतीने ठराव पारित झाला.
पिंपरी-चिंचवड भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती व सर्व सामाजिक संस्था, संघटना सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने भक्ती शक्ती शिल्पसमूहालगची जागा
कायमस्वरूपी सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व शिवसृष्टीसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी या मागणीसाठी सुरू असणाऱ्या १९ फेब्रुवारी २०२३ पासून वेगवेगळ्या मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी दि. ५/८/२०२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२३ व सर्व समाज बांधवांनी एकमताने ठराव पारित करताना या जागेबाबत पी.एम.आर.डि.ए. प्रशासनाने बिल्डरांबरोबर केलेले सर्व व्यवहार रद्द करून ही जागा पिंपरी चिंचवड शहरासाठी सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवावी अशी स्पष्ट मागणी या ठरावाद्वारे समिती व उपस्थित जनसमुदायाने एक मताने केली आहे. हा ठराव भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर व जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी लोकांसमोर मांडला. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
यावेळी नेते संदिपान झोंबाडे, प्रल्हाद सुधारे, मनोज तोरडमल, भगवान शिंदे, हनुमंत नाना कसबे, सुरेश जोगदंड, आण्णा लोखंडे, युवराज दाखले, रामदास
कांबळे, सुनिल भिसे, झुंबरताई शिंदे, केसरताई लांडगे, आशाताई शहाणे, अरूण जोगदंड, सतीश भवाळ, दत्तु चव्हाण, डी.पी. खंडाळे, संजय ससाणे, किसन नेटके, राम पात्रे, रवींद्र खिलारे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, सचिन दुबळे, विशाल कसबे, शिवाजी साळवे, विठ्ठल कळसे, रामेश्वर बावणे, शंकर खुडे, अक्षय उदगिरे, चंद्रकांत लोंढे, वसंत वावरे, बालाजी गवारे, सविता आव्हाड, मीना कांबळे, मंगल रूपटक्के, महानंदा कसबे, मयुर घोलप, स्वप्निल वाघमारे, स्वप्निल जाधव, अभिमन्यू बल्लाळ, शीला गायकवाड, रेखा दुनघव, कुसुम कदम, मीरा आल्हाट, जनाबाई वैरागे आदी मान्यवर व हजारो नागरिकांनी हा ठराव एक मताने मंजूर केला.
त्याबद्दल सर्व समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित सर्व नागरिकांचे मारुती भापकर यांनी मनापासून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!