महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपंवडला पाणी पूरविणारे पवना धरण 100 टक्के भरल्याची पत्रकारनी केली पाहणी.

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील काही भाग आणि एमआयडीसीची तहान भागविणारे पवना धरण सोमवारी (दि. 21) सायंकाळी पाचपर्यंत 100 टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा मौसमात पावसाने उशिरा हजेरी लावली.

जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर महापौरांच्या हस्ते धरणावर जाऊन रितसर जलपूजन केले जात होते. मात्र दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून जलपूजनास फाटा दिला जात आहे. महापालिका प्रशासनाला या जलपूजनाचा विसर पडल्यामुळे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने व पुढाकाराने रविवार, दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी पवना धरणावर जावून जलपूजन करण्यात आले.
यावेळी पवना धरण खरोखरच 100 टक्के भरल्याची या पत्रकार बांधवांनी खात्री केली. पत्रकार बांधवांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.
रविवारी सुट्टी असल्यामुळे विकेंडचे औचित्य साधून शहरातील नागरिक मावळात पर्यटनाकरिता जात असतात. मात्र पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातील सदस्यांनी पवनामाईचे जलपूजन करून धरण परिसराची पाहणी करत धरण 100 टक्के भरल्याची अनुभूती घेतली.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड शहर डिजीटल मीडिया पत्रकार संघ व त्यांचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, आणि संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व कार्यकारणी पत्रकार संघ एकत्र येऊन पवना धरण 100 टक्के भरले म्हणून प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी धरण खरोखरच 100 टक्के भरले आहे. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने बापूसाहेब गोरे यांनी श्रीफळ फोडून जलपूजन केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थपाक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, प्रिंट मीडियाचे अध्यक्ष दादाराव आढाव, जेष्ठ पत्रकार संतलाल यादव, बाबू उर्फ सुनील कांबळे, गणेश शिंदे, जितेंद्र गवळी, गणेश शिंदे, मुकेश जाधव, विनय लोंढे, संतोष जराड, संघाचे प्रसिद्धी प्रमुख युनूस खतीब, आदी पत्रकार बांधव यावेळी जलपूजना करिता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!