अपघातआरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या “घरकुल” योजनेतील १६०इमारतीचे फायर ऑडिट केव्हां होणार ?..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ सप्टेंबर २०२३ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी २०१४ मधे बांधलेल्या घरकुल योजनेतील १६० इमारतीचे फायर ऑडिट
झालेले नाही. असे भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उपप्रदेशाध्यक्ष (म.राज्य) शांताराम गणेश खुडे यांनी मा. आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाने कळविले आहे.
या वेळी खुडे बोलले की पूर्णानगर चिखली येथे ३१/९/२०२३ रोजी पहाटे हार्डवेअरच्या दुकानात आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे पोलीस प्रशासन तसेच अग्निशामक, तसेच महावितरण त्यांच्याकडून
स्पष्टीकरण देण्यात आले. ज्या ठिकाणी हे अग्नी तांडव दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या अर्धा किलोमीटर वरती आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजनेतील १६० इमारती असून त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या पाहता २७ ते २८ हजार इतकी असून उद्या भविष्यामध्ये एखादी घटना घडू नये म्हणून प्रशासकांनी या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष देऊन सर्व इमारतीचे फायर
ऑडिट करण्याची अग्निशामक विभागास सूचना करावी. इथे राहणारे नागरिक २०१४ पासून इथे राहत आहेत. काही
इमारतीमध्ये बसवण्यात आलेले फायर बॉक्स त्यामधील वॉल रबर व कापडी पाईप त्याचप्रमाणे वॉल या सर्वांची दुरुस्ती किंवा पाहणी करण्यात आलेली नसून आज त्याची दुरवस्था फार भयंकर झालेली आहे.
उद्या जर अग्नीची दुर्घटना झाली होऊ नये पण ह्या फायर बॉक्स मधील उपकरणाचा काही ही उपयोग होणार नाही. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. एखादी घटना घडून गेल्यानंतर दुर्घटनेबाबत चौकशी समिती स्थापन करून तज्ञाकडून अभिप्राय मागवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य काळजी घेणे ही काळाची गरज आहे. मा. आयुक्त साहेब, तसेच अग्निशामक अधिकारी, महावितरण, पोलीस प्रशासन या सर्वांना आपण याबाबत सूचित करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा जेणेकरून पुढे भविष्यात कोणती ही अशी दुर्घटना घडणार नाही याची काळजी आपण आत्ताच घेणे आवश्यक आहे. अशा संदर्भाचे निवेदन प्रशासकांना दिल्याचे शांताराम खुडे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!