अभिनंदनमहाराष्ट्रमूंबईविशेषशैक्षणिक

दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकावर मुलींनी मारली बाजी..

न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ८५.७१%

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १० मे २०२६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या द्वारे  मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या मध्ये श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाचा निकाल ८५.७१% लागला असून पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. या मध्ये प्रथम क्रमांक कु. तन्वी अनिल चव्हाण ७४.४०% दुसरा क्रमांक कु. रिया सचिन चव्हाण ७२.२०% तिसरा क्रमांक कु. सिध्दी युवराज जाधव ६५.६०% चौथा क्रमांक कु. जान्हवी सर्जेराव भोसले ६२.४०% पाचवा क्रमांक कु. हर्षदा दत्तात्रय चव्हाण ६०.२०% प्रथम पाच विद्यार्थ्यांनीचे तसेच यशस्वी विद्यार्थी यांचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ. शाळा समिती व संस्थेचे उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार सर्व संचालक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button