“BS4 अंतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ५० संघटनांचा लोकतंत्र आणि संविधानाचा जनमहोत्सव”

प्रतिनिधी पुणे दि.०५ सप्टेंबर २०२३ रविवार दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी बामसेफ आणि मूलनिवासी या सामाजिक संघटनेने, सोबत इतर समविचारी ५० संघटना घेऊन, देशातील आजची विदारक राजकीय, सामाजिक परिस्थितीचा विचार डोळ्यापुढे ठेऊन, मनुवादी, प्रतिक्रांती कारी विचार धारेच्या सत्ताधारी वर्गाकडून, भारतीय सविधानावर हेतुपुरस्कार अतिक्रमण करून, ते बदलण्याची भाषा बोलत आहेत. त्याकरिता ज्ञानजोती सावित्रीबाई फुले प्रेक्षागृह, म. फुले वाड्याजवळ, गंजपेठ, पुणे येथे, “भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन राष्ट्रव्यापी महा जनजागरण अभियान अंतर्गत ” BS4 सामाजिक लोकतंत्र की ओर, या विषयावर , संविधान रॅली व प्रबोधन सत्र, हा कार्यक्रम घेण्यात आला.
{ “BS4 अर्थात भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन” }
संविधान रॅली सकाळी १० वाजता काढण्यात आली, विचार प्रबोधन सत्र हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला, पहिले सत्र सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत, मा. डॉ. विनोद पवार, केंद्रीय कार्यकारणी सदस्य, बामसेफ यांचे अध्यक्षतेखाली, बहुजन उद्धारक महामानव यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सूरू करण्यात आले. यावेळी मा. ॲड. शैलजा मोलक, मा. सुभाष वारे, मा. व्ही. के. सूर्यवंशी, मा. सुरेश कांबळे, यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सूत्र संचालन मा. कैलास तोरणे यांनी केले तर आभार संभाजी सावंत यांनी व्यक्त केले.
दुसरे सत्र दुपारी 03 ते 06 वाजे पर्यंत, आलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींची संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन बाबतची वैचारिक मांडणी, या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मा. एम. डी. चंदनशिवे राज्य अध्यक्ष बामसेफ महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली पार पडले,
यावेळी, भारतीय संविधान आणि लोकतंत्राच्या लाभार्थीचे सविधाना प्रती कर्तव्य काय असली पाहिजे.
संविधान वाचवण्या करिता, बहुजन समाजात जाऊन, संविधानाचे फायदे तोटे काय? याची जाणीव, व जागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांची रणनीती काय असली पाहिजे, यावर मा. जगदीश ओहोळ, मा. संजय (बाबा) करपे अध्यक्ष माळी महासंघ, मा. भीमरत्न प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, मा.अशोक कांबळे, मा. मिलिंद जावळे, मा. सागर ओरसे अध्यक्ष वडार समाज व युवक अध्यक्ष सर्व हारा पिंपरी चिंचवड शहर, मा. शीतल माळी इत्यादी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून, केंद्रातील व राज्यातील संविधान विरोधी सत्ताधारी वर्गाला, इ. स. 1942 प्रमाणे चले जावंचा नारा देऊन, सत्तेपासून पाय उतार करूयात अशी प्रत्येक वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात शपथ घेतली. आज येथे संविधान जागृती गीते गायक व गायिका यांनी सुरेख आवाजात, प्रबोधन पर गायली, शेवटी मार्गदर्शन व आभार महाराष्ट्र राज्य, बामसेफ संघटनेचे अध्यक्ष मा. एम. डी. चंदनशिवे यांनी सर्व उपस्थित मार्गदर्शक आणि श्रोतेगण यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.





