प्रभाग क्र.०८ मधील परिसरातील बेवारस वाहनांवर व टपर्या, पत्राशेडवर अतिक्रमण विभागाची कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९/०९/२०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त, प्रभाग क्र.०८ मधील बालाजीनगर परिसरातील बेवारस वाहनांवर व टपर्या, पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त – २ विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम यांचे निर्देशानुसार व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप. अभियंता सुर्यकांत मोहिते, प्रशासन
अधिकारी दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटील, व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्र. ०८ मधील बालाजीनगर परिसरातील ०२ बेवारस वाहनांवर व फ़ुटपाथवरील ०३ टपर्या व ५००० चौ. फुट पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत ‘क’ क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करुन नये तसेच अनधिकृत टपर्या व पत्राशेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, मा.आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये. अशा सुचना देण्यात आल्या आहे.



