महाराष्ट्रशहरसामाजिक
पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती उठविल्यानंतर प्रशासक शेखर सिंह काय म्हणाले?

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, ११ सप्टेंबर २०२३ पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती उठविल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, ‘’पिंपरी चिंचवड सारख्या झपाट्याने वाढणार्या शहरात स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती १२ वर्षांनंतर काढण्यात आली हे महापालिकेसाठी एक निर्णायक वळण आहे. नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असून शहराचा विकसनशील शाश्वत मार्ग मोकळा करण्यात आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यास यामुळे मदत होईल, तसेच महापालिका विविध प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊले उचलण्यास प्रयत्न करेल.’’



