पिं.चिं.म.न.पा.च्या हद्दीतील रूग्णालयात सर्वांना मोफत औषधोपचार मिळावा म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ सप्टेंबर २०२३ पॅंथर यूवा मोर्चा व बहुजन एकता आंदोलन यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयात सर्व नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावा म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले, त्या वेळी पॅंथर यूवा मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष रामभाऊ ठोके, बहुजन एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहरचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्रीकृष्ण वाघ पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वानखडे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रवी कांबळे, पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष संगीता कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष महिला मीनाताई वाघ, युवक उपाध्यक्ष सार्थक गौड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष राहुल रोकडे, शहर सचिव महेंद्र वाघ, निताताई हुले, शिखाताई मुळे, मिनाताई वाघमारे मायाताई मोरे, वाणीताई बोराडे, उपस्थित होते यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेना, रिपब्लिकन सेना, व इतर संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..





