
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ सप्टेंबर २०२३ रावेत पोलीस स्टेशन हद्दीत दि.०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी नामे दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेंन्ट मधील पञ्याच्या रुममध्ये मुंबई पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबा
ता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. सदर घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्षे यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२८ / २०२३ भा.द.वि.कलम.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळुन गेल्याने मा. पोलीस आयुक्त श्री.विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री. परदेशी’ यांनी गुन्हा उघडकीस आणनेकामी सुचना व आदेश दिले.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी नामे दिनेश रामविलास यादव हा गुन्हा केलेनंतर गेलेल्या मार्गाचे सी. सी. टी.व्ही फुटेज प्राप्त केले, यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना दि. ०७/०९/२०२३ रोजी स.पो.नि. / पी.आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौक कल्याण येथे आहे. अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलीस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलीस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री. परदेशी, पोलीस उप-आयुक्त श्री. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त श्री. पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. / पी. आर. शिकलगार, स.पो.नि. / विशाल जाधव, पोलीस उप निरीक्षक रविंद्र पन्हाळे, पो.हवा. / ४२५ कोळगे, पो.हवा. / ६७५ गायकवाड, पो.शि./ नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व म.पो.ना. धाकडे यांनी केली आहे.



