महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

माजी जनसंपर्क अधिकारी यांच्या कामकाजावर अक्षेप याचिका प्रशासकांच्या दारात

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ सप्टेंबर २०२३ मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना शांताराम खुडे उपप्रदेश अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पत्र दिले आहे विषय आहे. सामाजिक कार्यक्रमात ढवळाढवळ करून लाखो रूपये कमवणारे विषेश अधिकारी श्री. किरण गायकवाड यांना पालिका सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे, अन्यथा भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य उपोषण करणार असल्याचे या पत्रात लिहिले आहे.
या संदर्भात जेव्हां आम्ही शांताराम खुडे यांना भेटलो तेव्हां त्यांनी सांगीतले की…
वरील विषयस अनुसरून आम्ही निवेदन दिले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतील विशेष अधिकारी श्री. किरण गायकवाड हे पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद लावण्याचे काम करीत आहे त्यांच्या या कृत्यामुळे एखाद्या सामाजीक कार्येकर्त्याचा खून देखील होऊ शकतो, अशी परिस्थीती आज शहरामध्ये निर्माण झालेली आहे. श्री. किरण गायकवाड हे ठराविक कार्यकर्त्यांना हाताशी धरून मनपातील घोटाळे बाहर काढण्यास सांगुन व त्यातुन लाखो रुपये कमवातात, याची चर्चा संपुर्ण शहरामध्ये आहे. यामुळे पालिका प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे. यांच्यामुळेच पालिकेत माहिती अधिकार अर्जाची वाढ होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या दरम्यान काही ठराविक कार्येकर्त्यांना हाताशी धरून लाखो रुपये कमवण्याचे काम जोरदार सूरू आहे.
यामुळे श्री. किरण गायकवाड यांना सेवेतुन तात्काळ बडतर्फ करणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असे श्री. शांताराम खुडे यांनी सांगीतले यात ते पूढे बोलले की माजी जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांचा राजेशाही थाट, जनतेच्या पैशाची राखरांगोळी करणाराच आहे.
यात काही मूद्ये त्यांनी उपस्थित केले.
मुद्दा क्रमांक १. निवेदकाला पाच दिवसाच्या कार्यक्रमासाठी चक्क सत्तर हजार मानधन देतात त्या निवेदकाकडे काही पदविका किंवा निवेदक असल्या बाबतचे प्रमाणपत्र अनुभव आहे का ? याची ही शहा निशा न करता ७०,०००/- देणे म्हणजे पैशाची उधळ पट्टीच ना?…
माझ्या माहिती प्रमाणे मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या निवेदकाला ही इतके मानधन मिळत नसेल. किरण गायकवाड याने फक्त निवेदना साठी दिवसाला साधारण १४०००/- हजार उधळले आहेत.
विशेष म्हणजे निवेदक हे पालिकेच्या जनता संपर्क विभागात ही तात्पुरते कर्मचारी म्हणुन काम करायचे किती प्रेमळ होते हे माजी जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आपल्याच कर्मचार्‍याला दिवसाला इतके मोठे मानधन देतात.
मुद्दा क्र २. मान्यवर पदाधिकारी कलाकार यांच्या जेवण, चहा पाणी, निवास व्यवस्थेवर ३,५०,०००/- लाख इतका खर्च ..
मुद्दा क्र ३. स्मृतीचिन्ह, मानपत्रे, पुस्तके, रांगोळी व इतर काही खर्च ३,५०,०००/- लाख इतका खर्च…?
याबबत खुलासा मागायलाच पाहिजे, मुग गिळुन गप्प बसण्यापेक्षा हे खुले केलेच पाहिजे. असे श्री. शांताराम खुडे बोलले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!