राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उद्योगनगरीतील गणेश मंडळांना भेटी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ सप्टेंबर २०२३ राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी मागच्याच आठवड्यात रोहित दादांना घेऊन दुचाकी रॅली काढली तसेच त्यांना गणेश मंडळांच्या भेटीसाठी शहरात आणले. त्यापाठोपाठच काल राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचाही शहरातील गणेश मंडळांच्या भेटीगाठीचा दौरा तुषार कामठे यांनी आयोजित केला होता. ऑक्टोबरमध्ये शरद पवार साहेबांचा मोठा मेळावा घेणार असल्याचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले. तोपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांच्या भेटीने उद्योगनगरीतील वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी जयंत पाटील यांनी समर्थ कॉलनी मित्र मंडळ दळवीनगर, नव तरुण मित्र मंडळ चिंचवडगाव, भाट समाज मित्र मंडळ पिंपरी, सिद्धी आनंद पार्क चिखली, कृष्णा नगर लाईन बॉयज, राजे प्रतिष्ठान, मोरया मित्र मंडळ भोसरी, शिवतेज मित्र मंडळ दिघी, मित्र सहकार्य तरुण मंडळ, साधू वासवाणी मंडळ, नानापेठ तरुण मंडळ पिंपरी आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या. मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पहाटे २ वाजेपर्यंत सुरु होत्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, सुलक्षणाताई शिलवंत, गणेश भोंडवे, शकुंतला भाट, ज्योती निंबाळकर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, काशिनाथ जगताप, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, विशाल जाधव, प्रशांत सपकाळ, संजीवनी पुराणिक, योगेश सोनवने, सागर चिंचवडे, निलेश पुजारी, रोहिणी वारे, राजू खंडागळे, सोनाली घाडगे, तामचीकर आदी सोबत होते.

